Breaking News

पारनेरला मानव अधिकार प्रशिक्षण कार्यशाळा


पारनेर/प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज पारनेर व राष्ट्रीय मानव अधिकार आयोग नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मानव अधिकार प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे उपस्थित होते.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, प्रमुख अतिथी डॉ. शंकर लावरे, उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे, हिंदी विभागप्रमुख डॉ. विजयकुमार राऊत, राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.विरेंद्र धनशेट्टी, कार्यशाळेचे समन्वयक प्रा. अशोक ठोकळ, मराठी विभागप्रमुख डॉ.हरेश शेळके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. शंकर लावरे म्हणाले की, मानवी जीवन जगताना विश्‍वासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थी दशेत आपल्याकडे नम्रता असायला हवी, आज्ञाधारकपणा असावा, आत्मविश्‍वास असावा, शिस्त असायला हवी, नेतृत्व क्षमता असायला हवी, आपले मित्र सक्षम असायला हवेत, आपल्या सर्वांना नीतिमूल्यांची जाणीव असायला हवी, या दृष्टीने आजची कार्यशाळा अतिशय महत्त्वाची आहे. या कार्यशाळेत प्रा.विरेंद्र धनशेट्टी यांनी मानव अधिकार या विषयावर व्याख्यान दिले.

प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर म्हणाले की, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य तसेच आपली कर्तव्य, मूल्य यांची जाणीव, ओळख विद्यार्थी दशेत व्हावी हा दृष्टिकोन समोर ठेऊन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे आयोजन प्रा.शिवाजी पठारे, प्रा.अनिल चिंधे, डॉ.प्राजंली भराटे, प्रा. रूपाली कदम, प्रा.प्रतिक्षा तनुपुरे, प्रा. अपेक्षा गाडेकर, डॉ.माया लहारे, प्रा.आश्‍विनी मुटकुळे, प्रा.अर्चना फुलारी यांनी केले.