Breaking News

कोळगावला महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रम

कोळगाव/प्रतिनिधी: कोळगाव येथील आराध्य दैवत महादेव मंदिरात
महाशिवरात्रीच्या यात्रात्सोव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवलीलामृत पोथीचे पारायण होऊन सकाळी महादेवाचा अभिषेक होऊन यात्रात्सवास सुरवात झाली. 

आईवडिलांच्या सेवेतच जीवनाचे सर्व सार सामावले असल्याने जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो व मनुष्य सुखी होतो असे ह.भ.प.धर्माजी सुपेकर महाराज यांनी आपल्या प्रवचनात सांगितले. यावेळी हजारो भाविकांनी महादेवाचे मंदिरात येऊन दर्शन घेतले. यानंतर कोळगाव येथील प्राथमिक शिक्षक संघटनेने आलेल्या सर्व भाविकांना खिचडीचा महाप्रसादाचे वाटप केले. संध्याकाळी महादेवाच्या पालखीची ग्रामप्रदक्षीना झाली. यावेळी मोठ्याप्रमाणात फटाक्यांची आकर्षक आतिषबाजी करण्यात आली.