राशिनला एएलपीवर सहविचार सभा उत्साहात


कर्जत/ता प्रतिनिधी: तालुक्यातील राशीन येथील श्री जगदंबा विद्यालयात नववीच्या विद्यार्थ्यांना जलद गतीने शिक्षण (एएलपी) देण्यासाठी शिक्षकांची सहविचार सभा झाली. मराठी, इंग्रजी,गणित व विज्ञान या विषयांचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी शनिवारी सकाळी दहा ते दोन या वेळेत सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले.

शिक्षण विभागाच्या वतीने राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत इयत्ता नववीसाठी जलद गतीने शिक्षण (एएलपी) प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतआहे. नववीच्या विद्यार्थ्यांची गणित, इंग्रजी, मराठी व विज्ञान विषयांत प्रगती करण्यासाठी शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात येत असून शिक्षकांनी स्वतःच्यासंकल्पनेतून साकारलेल्या विविध अध्यापन पद्धती, क्लृप्त्या यावर चर्चा केली जात आहे. जगदंबा विद्यालयात झालेल्या सहविचार सभेत महादू भिसे यांनीस्लाईड शोच्या माध्यमातून शिक्षकांना माहिती दिली. विद्यार्थ्यांना शिक्षण प्रक्रियेत अधिकाधिक सहभागी करून घेण्यासाठी विविध मुद्दे सुचवले. खेडच्यालोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयातील प्रा. किरण जगताप यांनी मराठी विषयातील सारांश लेखन मुद्द्यावर मार्गदर्शन केले. अशोक कापसे यांनीइंग्रजीतील शब्दांच्या जाती व व्याकरणातील मुद्द्यांवर चर्चा घडवून आणली. समारोपात शिक्षकांनी विषयनिहाय चर्चा घडवून आणली.१५ शाळातील शिक्षक यासहविचार सभेत सहभागी झाले होते.

◾एएलपीचा उद्देश

प्रामाणिकपणे नववी उत्तीर्ण होणे, विद्यार्थ्यांना स्वतः अध्ययनास प्रवृत्त करणे, गुणवत्ता विकास करणे, आत्मविश्वास निर्माण करणे, आनंददायी शिक्षण देऊनविद्यार्थी उपस्थिती वाढविणे, कृतिशील व रचनावादी अध्यापनातून तयारी करून घेत त्यांना दहावी परीक्षेसाठी तयार करणे आदी जलद गती शिक्षणाचे उद्देशआहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget