आनंदऋषी हॉस्पिटलने जोपासला रुग्णसेवेचा यज्ञ : अनिल राठोड


अहमदनगर /प्रतिनिधी : “जैन आचार्य आनंदऋषीजींचे आशीर्वाद व परमपूज्य व प्रबुद्ध विचारक आदर्शऋषीजींचे मार्गदर्शन व युवा जैन सोशल फेडरेशनच्या सक्रिय योगदानामुळे हॉस्पिटलमधील रुग्णसेवेचे कार्य बहरत असून हे शिबीर नसून हा एक रुग्णसेवेचा यज्ञ आनंदऋषीजी हॉस्पिटलने जोपासला आहे, संपूर्ण भारतातून या हॉस्पिटलच्या चांगल्या कामाची प्रचीती मिळत असून माफक दरात अत्याधुनिक चांगली रुग्णसेवा देणारे हे हॉस्पिटल गरजू, गरीब रुग्णांसाठी एक मंदिरसमान आहे’’, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले. 

येथील जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये आनंदऋषीजींच्या 27 व्या पुण्यस्मृतीदिनाचे औचित्य साधून विविध मोफत आरोग्य शिबिराचा शुभारंभ शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते दीप प्रजवलनाने करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. 

अस्थिरोग तपासणी व सांधे बदली शिबिरासाठी स्व. छाया अमृत गांधी यांच्या स्मरणार्थ अमृत गांधी व परिवाराने योगदान दिले आहे.शिबिराच्या उदघाटनप्रसंगी अभय गांधी, डॉ. अभय भंडारी, डॉ. सोनाली भंडारी, कुंतीलाल गांधी, राजेंद्र कटारिया, विजय कटारिया, वंदना गांधी, चि. प्रणव, अनुष्का, आशय गांधी, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अनिल शिंदे, नगरसेवक दत्ताभाऊ कावरे, नगरसेवक अप्पा नळकांडे, डॉ. प्रकाश कांकरिया, सतीश लोढा, संतोष बोथरा, डॉ. आशीष भंडारी, वसंत चोपडा आदी उपस्थित होते.

सुरुवातीला जैन सोशल फेडरेशनच्या वतीने संतोष बोथरा यांनी स्वागत करून हॉस्पिटलच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. खर्‍या अर्थाने या हॉस्पिटलमध्ये रुग्णाला चांगली अद्ययावत सेवा मिळावी यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न असून मोफत शिबिराच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो गरजू गरीब रुग्णांनी फायदा घेतला आहे. अशा शिबिरांसाठी अनेक योगदात्यांनी दिलेल्या योगदानामुळे हे शक्य होत असल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
शिबिरामध्ये डॉ. अखिल धानोरकर, डॉ. नितीन वर्पे यांनी रुग्णांची तपासणी केली. 288 रुग्णांनी या शिबिराचा फायदा घेतला. माजी महापौर भगवान फुलसौदर यांनी महाशिवरात्रीच्या पवित्र दिनी अशा मोफत शिबिराचा प्रारंभ करीत असल्यामुळे आपले सेवेचे कार्य बहरत जावो’’, अशी आशा व्यक्त केली.

आयोजक परिवाराच्या वतीने वंदना गांधी यांनी मनोगत व्यक्त करुन आईच्या इच्छेनुसार आम्हाला मिळालेली रुग्णसेवेची संधी ही आमच्यासाठी भाग्याची गोष्टी असून त्याबद्दल त्यांनी हॉस्पिटलच्या परिवाराचे आभार मानले.
डॉ. नितीन वर्पे यांनी मार्गदर्शन केले. अनिल राठोड यांच्या हस्ते योगदाते गांधी व कटारिया परिवाराचा यथोचित सत्कार करण्यात आला. प्रकाश छल्लाणी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन दत्तात्रय वरकड यांनी केले. दि. 7 मार्चला हर्निया, हैड्रोसील व इतर जनरल शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून गरजूंनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जैन सोशल फेडरेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget