Breaking News

ग्रंथालय अनुदान दुप्पट करण्यास मान्यता


कराड,(प्रतिनिधी) : ग्रंथालय अनुदान दुप्पट करण्याची मुख्य मागणी मान्य करतानाच ग्रंथालयीन कर्मचार्‍यांचे वेतन थेट जमा करण्यासही मान्यता दिली आहे.

शनिवार (दि. 2) मार्च रोजी मुंबई येथे सह्याद्री अथितीगृहावर मंत्री विनोद तावडे याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण सचिव श्री. कहार, कक्ष अधिकारी अनिल सावरे, ग्रंथालय संचालक प्रताप राठोड व मुख्य सहाय्यक ग्रंथालय संचालक श्री. येवले यांची या बैठकीस प्रमुख उपस्थिती होती. या वेळी रवींद्र कामत, कमलेश यादव, प्रशांत निकम, संजय पिसाळ, प्रदिप काकडे, राम पाटील, संदिप गायकवाड, राजेश्र्वर मांडवे, सौ. घाटगे, सौ. खेतमर, सौ. गुरव, सौ. कुंडलकर,सौ. माळी, मामा अक्रूर, रमेश सुतार, सुनील कुबोल, सुनील पाटील, दिलीप भिकूले यांनी या प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व करताना ग्रंथालय चळवळीच्या सर्व अडचणींची जाणीव मंत्र्यांना करून दिली.