Breaking News

पत्तीपाती झान्सी यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड


प्रवरानगर/प्रतिनिधी : प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय तृतीय वर्षातील विद्यर्थिनी पत्तीपाती झान्सी हिची भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या संशोधन फेलोशिप योजने अंतर्गत मेघालयातील नॉर्थ इस्टर्न हिल युनिव्हर्सिटी शिलाँग येथे दोन महिण्याच्या उन्हाळी संशोधन प्रशिक्षणासाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट समन्वयक प्रा.महेश चंद्रे यांनी दिली. 

या प्रशिक्षणासाठी पत्तीपाती झान्सी या विद्यार्थिनीला प्रति महा.10 हजार रुपये संशोधन फेलोशिप मिळणार असून या प्रशिक्षणासाठी डिपार्टमेंट ऑफ बायोटेक अण्ड बायोइन्फोचे जगप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ.रामाराव सत्यवाडा यांचे तिला संशोधनासाठी मार्गदर्शन मिळणार आहे. या विद्यार्थिनीच्या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महानिदेशक डॉ.यशवंत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ.हरिभाऊ आहेर, तांत्रिक संचालक डॉ.के.टी.व्ही रेड्डी, डॉ.दिगंबर खर्डे, ट्रेनिंग अण्ड प्लेसमेंट समन्वयक डॉ.धनंजय आहेर, कृषी संलग्नित महाविद्यालयाचे संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,प्राचार्य ऋषिकेश औताडे आणि इतर शिक्षकांनी अभिनंदन केले.