Breaking News

नेहरु युवा केंद्राव्दारा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात


 बुलडाणा,(प्रतिनिधी): भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयातंर्गत असलेल्या नेहरू युवा केंद्र बुलडाणा व्दारा दिनांक 24 मार्च रोजी क्रीडा संकुल बुलडाणा येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेच्या बक्षीसवितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी पुरवठा अधिकारी अमसिंग पवार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. प्रविण डाबरे, क्रीडा शिक्षक रविंद्र गणेशे, डॉसबॉल संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कैलास करवंदे, प्रा.बाबाराव सांगळे हे उपस्थीत होते.

 यावेळी खो-खो मुलांमध्ये प्रथम क्रमांक चंदनशेष क्रीडा मंडळ, सवणा यांना तर व्दितीय क्रमांक बुलडाणा खो-खो प्रशिक्षण यांनी पटकविला. खो-खो मुलीमध्ये प्रथम क्रमांक चंदनशेष क्रीडा मंडळ, सवणा यांना तर व्दितीय क्रमांक बुलडाणा खो-खो प्रशिक्षण यांनी पटकविला. हॉलीबॉल मुलीध्ये प्रथम क्रमांक अरुणोदय क्रीडा मंडळ, जळगांव जामोद व्दितीय क्रमांक बुलडाणा संघाने पटकावीला. हॉलीबॉल मुलाध्ये प्रथम क्रमांक जामोद बुलडाणा संघाने व्दितीय क्रमांक अरुणोदय क्रीडा मंडळ, जळगांवने पटकावीला. कबड्डीमध्ये प्रथम क्रमांक शिवाजी युवक क्रीडा मंडळ, बुलडाणा तर व्दितीय क्रमांक चिंतामणी क्रीडा मंडळ खांडवी यांनी पटकेेावीला तर तृत्तीय क्रमांक संघर्ष मित्र मंडळ उमरा, खामगांव यांनी पटकावला. 100 मीटर धावणे मुलांमधून चेतन समाधान गवळी प्रथम क्रमांक तर व्दितीय गोपाल लक्ष्मण हाडे तर तृतीय शुभम अफ्रुतकर. मुलींमधुन प्रथम क्रमांक नेहा जाधव, व्दितीय- एकता राजपूत तर तृतीय- विजया खरात यांनी पटकाविला. लांबउडी मुलांमधुन प्रथम - चेतन गवळी, व्दितीय- शुभम अफ्रुतकर, तृतीय- भगवान ढवळे, लांबउडी मुलींमध्ये प्रथम - शितल भाकरे, व्दितीय- निकीता राठोड, तृतीय- निकीता परीहार यांनी पटकावीले, गोळा फेक मुलांमधून प्रथम- प्रदुल जाधव, व्दितीय-कपील गवई, तृतीय-अमोल इंगळे, गोळा फेक मुली प्रथम - शितल भाकरे, व्दितीय- कोमल भाकरे, तृतीय - सानीका शिंदे यांनी पटकवीले. यावेळी स्पर्धेचे पंच सागर उबाळे, प्रमोद येवुल, मनोज श्रीवास, दिलीप गाढवे, म.इद्रीस, प्रमोद येउल यांनी काम पाहिले. 

आपल्या अध्यक्षीय भाषणांत अमरसींग पवार, पुरवठा अधिकारी, बुलडाणा यांनी खेळांडूना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरीकांमध्ये जागृती करण्याचे आवाहन केले. तसेच रविंद्र गणेशे यांचेही समोयोचीत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमांचे प्रास्तावीक अजयसींग राजपूत यांनी केले. संचलन सागर उबाळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.बाबाराव सांगळे यांनी केले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी धनजय चाफेकर, अविनाश मोरे, विजय जाधव, गणेश डोंगरदिवे व प्रतीक मोरे यांनी परीश्रम घेतले.