Breaking News

कास्ट्राईब महासंघातर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन


सातारा/ प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब महासंघातर्फे मागासवर्गीय कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांबाबत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना संघटनेचे महासचिव नामदेवराव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन सादर करण्यात आले. त्या वेळी जिल्हाधिकार्‍यांसह निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली.

महासंघाचे राज्य उपाध्यक्ष सुशीलकुमार कांबळे, पुणे विभागीय सचिव प्रविणकुमार चांदणे, समता सैनिक दलाचे कॅप्टन अरुण पोळ, आयटीआयचे गुरव, समाजकल्याण विभागाचे राजू आढाव, भूमी अभिलेख राज्याध्यक्ष मनोज मस्के, शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघटनेचे मिलिंद कांबळे, जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री. कांबळे, विद्या पारखे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे मुख्याध्यापक चंद्रकांत मस्के, अनिल वीर, प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मोरे, रवींद्र चव्हाण आदी विविध क्षेत्रातील मान्यवर - कार्यकर्ते उपस्थित होते.