Breaking News

अमृतवाहिनीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा उत्साहात


संगमनेर/प्रतिनिधी: अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या चतुर्थ वर्षात शिकणार्‍या विद्यार्थ्यांचा ग्रामिण भागातील तंत्रज्ञान आणि विकास या संदर्भातील अभ्यास दौरानुकताच आदर्श गाव राळेगण सिध्दी आणि हिवरे बाजार येथे पार पडला. तंत्रज्ञानाबरोबरच शुध्द विचार आणि थोडा त्याग केल्यास ग्रामिण भागाचा विकास होईल असे मत यावेळी पद्मभूषणअण्णा हजारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना व्यक्त केले़.

विद्यार्थ्यांनी अण्णा हजारे यांच्याशी हितगुज करतांना नवनवीन प्रकल्पांची माहिती ही दिली़. यावेळी प्रा़ योगेश चिकणे, प्रा. सुदीप हासे, बालिका भोसले यांनीही आण्णांना महाविद्यालयाच्यायशाचा आलेख आणि ग्रामिण भागासाठी चालणार्‍या योजना सांगितल्या़ . सोलर कार, हार्वेस्टिंग मशिन, कांदा काढणी यंत्र, जलसंधारण याविषयी अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयानेकेलेल्या कामाची माहिती प्रा. हासे आणि प्रा. चिकणे यांनी दिली.

हिवरे बाजार येथील भेटीत उपसरपंच पोपटराव पवार यांनी लोकसहभागातून हिवरे बाजारचा विकास कसा केला याविषयी माहिती दिली़. वेळेचा उपयोग, पाण्याची काटकसर, जलसंधारण, पाण्याची पातळी, विविध पिके, शासनाच्या योजना, सामाजिक कामाची ओळख त्यांनी विद्यार्थ्यांना करुन दिली़.