Breaking News

सावन शेटे यांना 'पै.खाशाबा जाधव राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार'


कर्जत/ प्रतिनिधी: मान-अभिमान विकास फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीने दिला जाणारा पै.खाशाबा जाधव राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथील मल्ल सावन अरुण शेटे यांना देऊन सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार पुणे (भोसरी) येथे शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजित साळुंके,उद्योगपती अनिल सौंदडे, अर्जुनवीर विजेते पै.काकासाहेब पवार,राष्ट्रकुल पदक विजेते रणजित नलवडे यांच्या हस्ते देण्यात आला.