Breaking News

पुराणातील ग्रंथ हे मानवजातीच्या प्रबोधनासाठी- हभप कुलकर्णी


पारनेर/प्रतिनिधी
मानवजातीच्या उत्क्रांतीनंतर अनेक पुराने आणि धर्मग्रंथाची निमिर्ती झाली. त्यामधून जे लिखाण झाले ते अखंड मानवजातीमध्ये एकोपा प्रेम स्नेह वाढीस लागावा. त्यांचे प्रबोधन व्हावे, हाच मुळ उद्देश धर्मग्रंथाचा होता. म्हणून पुराणातील धर्मग्रंथ हे समाज प्रबोधनासाठीच असल्याचे प्रतिपादन हभप रमेश कुलकर्णि यानी केले. पारनेर तालुक्यातील विरोली येथील गणपती चौफुला गणपती मंदिरात अथोजीत केलेल्या 29 व्या अखंड हरिनाम सप्ताह किर्तन मालेतील पाचवे पुष्प गुंफताना ते बोलत होते.

यावेळी प्रसिद्ध ज्योतीष शास्त्राचे अभ्यासक प्रभाकर अण्णा पोळ यांच्यासह पारनेर तालुक्यातील भाविक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

हभप कुलकर्णी पुढे बोलताना म्हणाले की, अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून समाजाचे एकत्रीकरण करुन विचारांचे प्रबोधन केले जाते. त्यानिमित्त केलेल्या परमेश्‍वर भक्तीचा आनंद चिरकाल टिकणारा असतो. निरपेक्ष वृत्तीने केलेली भक्ती ही परमेश्‍वराला आवडते. म्हणूनच ऐसी थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेवीले. अनंते तैसीची रहावे चित्ती असू द्यावे.