Breaking News

विजय भोसले यांना समाजरत्न पुरस्कार


कर्जत/प्रतिनिधी

राशीन येथील विजय भोसले यांना जोगेश्वरी पूर्व मुंबई येथील यशस्वी एजुकेशनल अँड चारिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आदिवासी, पारधी समाजातील वंचित, अपेक्षित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी राशीन येथे संकल्प निवासी वसतिगृह सुरू केले आहे. सामाजिक भावनेतून भोसले यांनी गेल्या चार वर्षांपासून भरीव काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या सचिव प्रणिता भोसले,विपुल परब, स्वाती धर्मेश, गिता झगडे, विकास घोगरे, लक्ष्मी शमनथुल, सीमा राऊत आदी उपस्थित होते.