Breaking News

ऐन दुष्काळात हजारो लिटर पाणी वाया


पाथर्डी/प्रतिनिधी: पाथर्डी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे याठिकाणी ऐन दुष्काळात पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना या ठिकाणावरून हजारोलिटर पाणी वाया जात आहे.

येथील राष्ट्रीय महामार्गावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारका समोर नगरपालिकेची पाईपलाईन लिकेज झाली आहे. यामुळे या ठिकाणावरून हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. दरम्यान नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांनीपाणी काटकसरीने वापरावे,पाणी वाया घालवू नये यासाठी विविध सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु या पाणी वाया जाण्याच्या घटनेकडे पालिका गांभीर्याने पाहणार का , पालिका प्रशासनाकडून यावर कारवाई केली जाणार का ? असाप्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

यामध्ये मुख्याधिकाऱ्यांची भूमिका काय असणार याकडे शहराचे लक्ष्य लागले आहे..

एकीकडे तालुक्यात भयाण दुष्काळ पडला असून बहुतेक गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच शहरात प्रत्येक भागात ४ दिवसांनी पाणी सुटत आहे. तर काही जणांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असतानानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून पाणी वाहत जाऊन कोरडगाव चौकात डबके साचून पुढे शेवगाव रोडपर्यंत पाणी वाहत गेले होते. झालेल्या पाण्याच्यानासाडी बद्दल नगरपालिका प्रशासनाविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मुख्याधिकार्यांना कल्पनाच नाही

सदर घटनेबद्दल व त्याच्या दुरुस्तीबद्दल मुख्याधिकार्यांना विचारले असता सदर घटनेबद्दल मला कुठलीच माहिती नाही. असा प्रकार झाला आहे का याची चौकशी करावी लागेल अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी दिली