Breaking News

कर्जतच्या एनसीसी छात्रांना मुख्यमंत्री स्कॉलरशीप


कर्जत/प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयातील सर्वाधिक एन.सी.सी. छात्र सैनिकांना मुख्यमंत्री स्कॉलरशीप मिळाल्याची माहिती प्राचार्य डॉ.बाळ कांबळे यांनी दिली.

एन.सी.सी. प्रशिक्षणात अव्वल असणार्‍या, विविध शिबीरांमध्ये सहभागी झालेल्या आणि आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना प्रशिक्षण वर्ष 2018-19 मध्ये मुख्यमंत्री निधीमधून महाविद्यालयातील 9 एन.सी.सी. छात्र सैनिकांना ही स्कॉलरशीप मिळाली आहे. त्यात प्रतिभा गायकवाड, पुष्पा तांदळे, सविता नेटके, निलेश गुंजाळ, रितेश घोडके, तुकाराम ननवरे, योगेश ढेकळे, लहू यादव, आशिष दळवी या छात्र सैनिकांचा समावेश आहे. त्यांना मेजर संजय चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी छात्र सैनिकांचे कर्नल विक्रम दाते व प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांनी अभिनंदन केले.