Breaking News

महिला पोलिस अधिकार्‍याची गोळ्या घालून हत्या


नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी विशेष महिला पोलिस अधिकार्‍याची गोळ्या घालून हत्या केली. या महिला पोलिस अधिकार्‍याचे नाव खुशबू जान असे आहे. त्यांना घरासमोरच दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. पोलिसांनी याबाबत स्वतंत्र गुन्हा नोंद करुन चौकशीस सुरुवात केली आहे.

 तसेच सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली आहे. राज्य पोलिस दल विशेष पोलिस अधिकार्‍यांची दहशतवादाशी लढण्यासाठी नेमणूक करत असते. त्यांना महिन्याला मानधन देण्यात येते; पण त्यांना शस्त्र चालवण्याचे कोणतेही प्रशिक्षण दिले जात नाही तसेच त्यांच्याकडे कोणतेही शस्त्रही दिले जात नाही. विशेष पोलिस अधिकार्‍यांचा हुद्दा हा कॉन्स्टेेबलच्याही खालचा असतो.