Breaking News

भोयरे गांगर्डा अंगणवाडींची रांजणगाव दर्गा येथे सहल


पारनेर/प्रतिनिधी: पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील गावठाण व विठ्ठलवाडी अंगणवाडीच्या मुलांची सहल रांजणगाव येथील सुप्रसिद्ध दर्गा येथे गुरुवार दि.14 रोजी काढण्यात आली.

दर्गा येथे सहलीचे आगमण झाल्यानंतर तेथील परिसर पाहून चिमुकल्यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी मुलांकडून गाणे, गोष्टी, भाषणे आदी कार्यक्रम घेण्यात आला. यादरम्यान मोहन पवार यांच्या मार्फत सर्व मुलांना खाऊंचे वाटप करण्यात आले. मुलांना लहान वयात बाहेरील सर्व गुण प्राप्त व्हावे, त्यांना शाळेत येण्याची आवड निर्माण व्हावी. यासाठी दोन्ही अंगणवाडी मार्फत विविध उपक्रम राबवले जातात. दरवर्षी याप्रमाणे विविध ठिकाणी सहलीचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती अंगणवाडी सेविका उज्वला भोगाडे यांनी दिली. 

सहली दरम्यान किरण भोगाडे, ज्ञानदेव केकडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सहलीसाठी अंगणवाडी सेविका उज्वला लक्ष्मण भोगाडे, आशा प्रितम रसाळ, मदतनिस सुरेखा संतोष रांजणे व सुप्रिया संतोष केकडे यांनी परिश्रम घेतले.