Breaking News

बिबट्याचा बछडा आढळला मृतावस्थेत


संगमनेर/प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी-खांजापूर शिवारात काल सकाळी उसाच्या क्षेत्रात बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला. दरम्यान, संगमनेरच्या वनविभागास या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या सहकार्यासमवेत येथे दाखल झाले. सुकेवाडी-खांजापूर शिवारातखाजगी क्षेत्रात अंदाजे सात महिन्यांचा मादी बिबट्याचा बछडा काही ग्रामस्थांना मृत अवस्थेत आढळला. 

या प्रकाराची माहिती ग्रामस्थांनी वनविभागास कळविल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी बाळासाहेब गीते, वनरक्षक अंबादास मेहेत्रे, वनरक्षक योगेश डोंगरे, वनमजूर दत्तात्रय पर्बत आदी दाखल झाले. मृत बछड्याला वाहनातून निंबाळे रोपवाटिकेत आणण्यात आले. पशूवैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याचे शवविच्छेदन केले. आजारपणामुळे बछड्या मृत झाला असल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले.