Breaking News

भावीकांच्या देणगीतून मळगंगा देवीच्या मखराचे काम


निघोज/प्रतिनिधी
राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या गाभार्‍यातील मखर व इतर दागीणे तयार करण्याचे काम गोरेगाव (मुंबई) यतीन पंचाल यांनी केले आहे. साधारण यासाठी 43 किलो चांदी लागली असून मजूरीसहीत एकूण रक्कम 22 लाख रुपये खर्च झाला आहे. लोकसहभागातून तसेच भावीकांनी दिलेल्या देणगीतून हे काम झाले आहे. मुंबई येथील सराफ यतीन पंचाल यांनी राज्य तसेच परराज्यातील अनेक मंदीराचे मखर तसेच मुखवटे सोन्याचांदीचे दागीणे तयार केले आहे. त्यांचा याबाबत देशात नावलौकीक झाला आहे. या मखर व ईतर दागीण्यांमुळे देवीचा गाभारा अतिशय आकर्षक दिसत आहे. महिनाभरात देवीचा चांदीचा मुखवटा व सोन्याचा अरक (गोल्ड) तयार करण्याचे काम सुरू आहे.

यावेळी मुंबईचे सराफ यतीन पंचाल यांचा सत्कार मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कोषाध्यक्ष ज्ञानदेव लंके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे जेष्ठ विश्‍वस्थ नानाभाऊ वरखडे, बबनराव ससाणे, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब लामखडे, सुनिती ज्वेलर्सचे मालक गणेश कटारिया तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.