Breaking News

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा कराडला प्रारंभ


सातारा,  (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा कराड तालुक्याचा शुभारंभ कार्यक्रम येथील कराड अर्बन बँकेच्या सभागृहात वरिष्ठ अधिकारी, कृषी व निगडीत विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेतकर्‍यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

कार्यक्रमास पंचायत समिती सभापती फरिदा इनामदार, सदस्या सुरेखाताई पाटील, सातारा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कैलास शिंदे, प्रांताधिकारी हिंम्मत खराडे, तहसीलदार अमरदीप वाकडे, कराड पंचारत समितीचे गट विकास अधिकारी डॉ.आबासाहेब पवार, कराड तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, कराड तालुका सहकारी संस्था उपनिबंधक महेंद्र चव्हाण, कृषी विज्ञान केंद्र कालवडे प्रमुख निलेश मालेकर, सर्व मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, महसूल विभागाचे मंडलाधिकारी, तलाठी, ग्राम विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, कृषी विज्ञान केंद्राचे सर्व शास्त्रज्ञ व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

या कार्यक्रमात सुरवातीला योजनेची माहिती प्रांताधिकारी हिंम्मत खराडे यांनी दिली. प्रधानमंत्री यांची मन की बात व गोरखपूर येथील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ कार्यक्रमाचे प्रसारण झाल्यावर कराड तालुक्यातील शेतकर्‍यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करणेत आला. कृषी मंडलाधिकारी सुनील ताकटे यांनी सुत्रसंचालन केले. अशोक कोळेकर यांनी आभार मानले.