Breaking News

अंधारीचा कराटेपटू सागर शेलार यांना खाशाबा जाधव राष्ट्रीय पुरस्कारपरळी / वार्ताहर : जिल्हयाच्या बामणोली विभागातील अंधारी (ता. जावली) गावचे युवा कराटेपटू सागर धनाजी शेलार यांना ऑलिंपिकवीर पै. खाशाबा जाधव राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार पुणे येथे येत्या रविवारी, दि. 10 मार्च रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

सागर शेलार याने घरच्या आर्थिक परिस्थितीवर मात करीत गावच्या शाळेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण करून मुंबईचा गाठली व पार्ट टाइम नोकरी करत कॉलेज शिक्षण सुरू ठेवले आहे. शालेय जीवनापासून कराटे खेळाची आवड असल्यामुळे त्याने या खेळात मुंबईतही आपले प्राविण्य दाखवून दिले. कराटेच्या नुकत्याच पंजाब येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत कास्यपदक पटकाविले आहे. तसेच सातारा जिल्हयाचे नाव मोठे करत सागरने कराटेजगतात एक इतिहास रचला आहे. तसेच तरुण पिढीसाठी एक आदर्श ठेवला आहे. सध्या सागर भारत एज्युकेशन ट्रस्टमध्ये कराटे खेळाडूंना मार्गदर्शन करत असतानाच आपले पदवीचे शिक्षणही घेत आहे.
या यशाबद्दल खा.उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिहराजे भोसले, जावलीच्या सभापती सौ. जयश्रीताई गिरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र संकपाळ आदींनी सागरचे अभिनंदन व कौतुक केले.