Breaking News

नागेवाडी येथील दोन क्रशर बंद करण्याचे आदेश


सातारा / प्रतिनिधी : तालुक्यातील नागेवाडी येथील स्टोन क्रशरमुळे होत असलेले प्रदुषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदुषण मंडळाने कारवाईचा धडाका सुरु केला आहे. अष्टविनायक स्टोन क्रशर व त्रिमुती स्टोन क्रशर कायमस्वरुपी बंद करण्याचे आदेश नुकतेच प्रदुषण मंडळाने दिले आहेत. याशिवाय या ठिकाणच्या अन्य काही स्टोन क्रशर मालकांना नोटीसा पाठवून ते बंद का करु नयेत, अशी विचारणा प्रदुषण मंडळाने केली आहे.

 यासंदर्भात मंडळाच्या अधिकार्‍यांकडून मिळालेली माहिती अशी आहे, सातारा तालुक्यातील नागेवाडी येथील डोंगर परिसरात गेल्या 20 वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाच्या उत्खनन केले जात आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी खाणीतून उडणारी धूळ वार्‍याबरोबर परिसरात पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. खाणींमध्ये दगड काढण्यासाठी अनेकदा सुरुंग लावले जातात. त्यामुळे आजुबाजुच्या परिसरातील लोकांच्या जीवितास धोका संभवतो, अशा तक्रारी नागरिकांनी यापुर्वी अनेकदा केल्या आहेत. मात्र अद्यापपर्यंत ठोस उपाययोजना केल्या गेल्या नव्हत्या. खाणींमध्ये उत्खनन वेगाने होतच राहिले. अर्धाधिक डोंगर पोखरला गेला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदुषण मंडळाने कारवाईचा बडगा उगारला असून दोन क्रशरवर कायमस्वरुपी
जिल्ह्यात विविध ठिकाणी स्टोन क्रशर सुरु आहेत. यापैकी जे बेकायदेशीरपणे उत्खनन करतात, नियमांचे पालन केले जात नाही असे क्रशर कामयस्वरुपी बंद करणार आहोत. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची आम्ही खबरदारी घेत आहोत. - बाबासाहेब कुकडे

उपप्रादेशिक अधिकारी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उर्वरितांपैकी काहींना नोटीसा देवून क्रशर बंद का करु नयेत, अशी विचारणा यांनी केली आहे.