Breaking News

लोणी मावळ्यात अखंड हरिनाम सप्ताह


निघोज/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथे महाशिवरात्रीनिमित संगमेश्‍वर मंदीरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताह काळात सकाळी पारायण हरीपाठ अशा अनेक भक्तिमय वातावरणात सप्ताहाचे नियोजन आहे.

या काळात ह.भ.प.लक्ष्मण महाराज नलावडे, अठरे महाराज, परमहंस महाराजगीरी, प्रकाश महाराज व दि.5 रोजी हभप महेश महाराज हरपणे यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. या काळात शिवशंकर गणेश तरूण मंडळ महादेव मळा व समस्त ग्रामस्थ मुंबईकर व लोणी मावळा ग्रामस्थानी या काळात विशेष परीश्रम घेतले. या सप्ताहास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आव्हाण मंडळाच्यावतीने करण्यात आले.