Breaking News

चापडगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहचापडगाव/प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथे संत तुकाराम महाराज संस्थान येथे विठ्ठल रुक्मिणी मूर्ती स्थापना सोहळ्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने भजन कीर्तन गाथा पारायण धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रामायणाचार्य मारुती महाराज झिरपे यावेळी राम कथेचे कथन करणार आहेत. या सप्ताहादरम्यान शिवशाहीर कल्याण काळे, हभप उल्हास महाराज सूर्यवंशी, हभप आदिनाथ महाराज शास्त्री तारकेश्‍वर गडकर, हभप मधुकर महाराज शास्त्री, तुकाराम महाराज जेऊरकर, विनोदाचार्य बाबासाहेब महाराज इंगळे, प्रकाश महाराज बोधले याचे कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत.