Breaking News

पिंपरी जलसेनच्या विद्यार्थ्याचे भविष्य उज्ज्वल- थोरात


पारनेर/प्रतिनिधी: जि.प.प्रा. शाळा पिंपरी जलसेन या शाळेत इ.1 ली ते 7 वी पर्यंत शिक्षण घेतलेले. या शाळेचे माजी विद्यार्थी दिगंबर हिरामण थोरात यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलिस उपनिरिक्षकपदी निवड झाल्याबद्दल शाळेच्यावतीने ठेवण्यात आलेल्या सत्कार समारंभानिमित्त दिगंबर थोरात यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

ग्रामीण भागात शैक्षणिक दर्जा प्रचंड उंचावलेला असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मागील महिन्यात जेव्हा पिंपरी जलसेनला आलो होतो. त्यावेळी संध्याकाळी 7.30 वाजेपर्यंत पिंपरी जलसेनची शाळा चालू होती व शाळेत शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग सुरु होता. याबद्दल त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतूक करुन अभिनंदन केले. आपल्या जडणघडणीत शाळेतील विविध प्रसंगाचे वर्णन करुन त्याकाळी मार्गदर्शन करणार्‍या गुरुजनांचे त्यांनी आभार मानले.

यावेळी पिंपरी जलसेनचे ग्रामस्थ कैलास घेमुड, हिरामण थोरात, शाळेचे मुख्याध्यापक गेणूभाऊ ठुबे, रा.औटी, श्रीम. रत्नमाला नरवडे, उपाध्यापक मल्हारी रेपाळे, भास्कर औटी, जयप्रकाश साठे, सतीश भालेकर व विद्यार्थी परिवारातर्फे दिगंबर थोरात यांचा सत्कार करण्यात आला.