Breaking News

सहाशे शिवभक्तांकडून जयगड किल्ल्याची साफसफाई


रत्नागिरी: गडसंवर्धनासाठी आलेल्या ठिकठिकाणच्या सहाशे शिवभक्तांनी जिल्ह्यात जयगड किल्ल्याची साफसफाई केली.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी उभारलेल्या गडकोटांची अवस्था बिकट झाली आहे. हे गडकोट जपण्यासाठी राजा शिवछत्रपती परिवारसज्ज झाला आहे. त्यासाठी राज्यातील २१ जिल्ह्यांमधील सहाशे शिवभक्त रत्नागिरीतील गडकोटांच्या संवर्धनासाठी दाखल झाले आहेत. 

शिवकालीन अनेकगडकिल्ल्यांची अवस्था बिकट झाली आहे. बुरूज-तटबंदी ढासळत आहेत. त्यांचे जतन करणे आणि ही संपत्ती पुढच्या पिढीला सुपूर्द करणे ही आपल्या सर्वांचीजबाबदारी आहे. यासाठी स्थापन झालेल्या राजा शिवछत्रपती परिवाराचे सदस्य राज्यभरात गडसंवर्धनाचे काम करीत आहेत. या परिवाराचे महिलांसह तब्बलसहाशे सदस्य रत्नागिरीत दाखल झाले आहेत. रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रत्नागिरीचेग्रामदैवत असलेल्या भैरीच्या मंदिरापर्यंत परिवाराने जनजागृती प्रभात फेरी काढली. तेथे देव दर्शन घेतल्यानंतर सर्वांनी परिसर स्वच्छता केली. त्यानंतर हिंदवीस्वराज्याचे पहिले आरमार सेनानी मायाजी भाटकर ऊर्फ मायनाक भंडारी यांच्या भाट्ये येथील समाधीचे दर्शन घेतले. मारुती मंदिर येथे प्रबोधनात्मक कार्यक्रम वसामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत असलेल्या रत्नांचा सत्कार करण्यात आला.

जयगड किल्ल्याचा संपूर्ण परिसर बालेकिल्ला, खंदकाची सफाई, तटबंदीवरची झुडपे, परकोटाची सफाई, बुरूज सफाई व इतर परिसर स्वच्छ करण्यात आला, असेउपेंद्र नागवेकर यांनी सांगितले.