Breaking News

निमगाव येथे रासेयो शिबीर


प्रवरानगर/प्रतिनिधी: प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालय व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विशेष शिबीराचे मौजे.निमगाव जाळी, ता.संगमनेर येथे नुकतेच उद्घाटन झाले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमगाव जाळीचे सरपंच अमोल जोंधळे, संगमनेर पं.स चे मा.सभापती मछिंद्र थेटे, सरपंच बाळासाहेब डेंगळे, सुजाता थेटे, प्रगतशील शेतकरी, कृषी संलग्नित महाविद्यालयांचे संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.निलेश दळे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.रोहित उंबरकर उपस्थित होते. या वेळी कृषी संलग्नित महाविद्यालयांचे संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, या शिबीराच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी स्वयंशिस्त, स्वावलंबन आदी गुण आत्मसात करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयोग करावा. यावेळी मछिंद्र थेटे, बाळासाहेब डेंगळे व प्राचार्य प्रा. निलेश दळे यांनीही मनोगत व्यक्त केले.