Breaking News

ग्रामीण रुग्णालय प्रश्‍नासाठी रिपाइंचा सामुहिक आत्मदहनाचा इशारा


राहुरी/प्रतिनिधी: राहुरी ग्रामीण रुग्णालय राहुरी हे बांधकाम प्रक्रिया खंडित करणार्‍या सर्व दोषींवर कडक कार्यवाही करून त्यांना तात्काळ निलंबीत करा व राहुरी ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम त्वरीत चालू करण्याचे आदेश द्यावेत. या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. मागणी मान्य न झाल्यास दि. 11 रोजी वर्षा बगल्यावर सामुहिक आत्मदहन करण्यात येईल असा इशारा आरपीआयच्या वतीने निवेदनाद्वारे निवासी जिल्हा अधीकारी यांना देण्यात आला.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुरी तालुक्यातील राहूरी शहरामध्ये ग्रामीण रुग्णालय सध्या अत्यंत छोट्या जागेत सुरु आहे. राहुरी शहारामध्ये ग्रामीण रुग्णालयाची स्वतः मालकीची 419अ 1अ पैकी 9 गुंठे तसेच 419/अ 1/2/ अ पैकी.16 गुंठे एकूण 25 गुंठे जागा उपलब्ध आहे. सदर जागेच्या ठिकाणी जुने ग्रामीण रुग्नालय सुरू होते. परंतु 2017 मध्ये राहुरी ग्रामीण रुग्नालयासाठी 17 कोटी निधी उपलब्ध झाल्या कारणाने तसेच बांधकाम सुरू करणे कामी सदर दवाखाना एका छोट्या जागेत स्थलांतर करण्यात आले होते. राहुरी शहर हे नगर-मनमाड रोड लगत असून शिर्डी-शनि शिंगणापूर या धार्मिक स्थळाच्या मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणाहून महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातून वाहने येत असतात. व या ठिकाणी अपघात होत असतात. अपघातग्रस्तांना व स्थानिक नागरिकांना राहुरीच्या ग्रामीण

रुग्णालयात प्रथोमपचार मिळत नसल्याने अनेक अपघातग्रस्तांना व नागरिकांना त्यांचा जिव गमवावा लागत आहे.

सदर ग्रामीण रुग्णालयास बांधकाम मंजुरी असतांनाही काही भष्ट्राचारी अधिकार्‍यामुळे त्या ठिकाणी सदर निधी परत मागे गेलेला आहे. सदर विषयासंबधी वेळोवेळी पाठ- पुरावा व आंदोलने केले पंरतु कुठल्याही प्रकारची कार्यवाही त्या संदर्भात झालेली नाही. सदर विषयामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी राहुरी ग्रामीण रुग्णालय राहुरी व शासनाची दिशाभूल केलेली आहे. व अधिकाराचा दुरुपयोग करून केवळ एका साध्या अर्जावर बांधकामाची कार्यवाही 3 वर्षापासून थांबवली आहे.

राहुरी ग्रामीण रुग्णालय राहुरी हे बांधकाम प्रक्रिया खंडित करणार्‍या सर्व दोषींवर कडक कार्यवाही करून त्यांना तात्काळ निलंबीत करा व राहुरी ग्रामीण रुग्णालय याचे बांधकाम त्वरीत चालू करण्याचे आदेश द्यावेत. या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. मागणी मान्य न झाल्यास 11/3/2019 रोजी वर्षा बगल्यावर सामुहिक आत्मदहन करण्यात येईल असा इशारा जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुका अध्यक्ष विलास साळवे, जिल्हा नेते बाळासाहेब जाधव, अरूण साळवे, सचिन साळवे, निलेश जगधने, सचिन डहाणे यांनी दिला.