Breaking News

‘शिवसमर्थ’च्या नृसिंहवाडी शाखेचा वर्धापनदिन उत्साहातढेेेबेवाडी / प्रतिनीधी : ऍड. जनार्दन लक्ष्मण बोत्रे यांच्या कुशल नेतृत्त्वाखाली स्थापन झालेल्या दि शिवसमर्थ मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीच्या नृसिंहवाडी शाखेचा प्रथम वर्धापनदिन नुकताच मोठया उत्साहात पार पडला. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शाखेला शुभेच्छा भेटी देऊन सदिच्छा व्यक्त केल्या. सन 2006 मध्ये भारतीय स्वातंत्र्यदिन शुभमुहूर्तावर तळमावलेमध्ये संस्थापक अध्यक्ष ऍड. जनार्दन लक्ष्मण बोत्रे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या संस्थेने अवघ्या 13 वर्षाच्या कालावधीत 33 शाखांसह 150 कोटी रूपये उलाढालींची गरूडझेप घेतली आहे. याशिवाय संस्थेच्या तळमावले, कराड, मल्हारपेठ, शेडगेवाडी, सणबूर, मान्याचीवाडी, पाटण, कोल्हापुर, विटा, रविवार पेठ-कराड, कोळे, विद्यानगर-कराड, काळगाव, मोरगिरी, वाडी रत्नागिरी, मलकापूर- शाहुवाडी, नृसिंहवाडी, पंढरपुर, बांबवडे, सातारा, वाई, साकुर्डी, चंदनवाडी, कांदिवली, कोपरखैराणे, उल्हासनगर, भायंदर, लालबाग, वांद्रे, ठाणे, विरार, खानापुर, अनगोळ येथे शाखा कार्यरत आहेत. नृसिंहवाडी शाखेने एक वर्षाच्या कालावधीत एक कोटी 35 लाख रूपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला असून खातेदार, ठेवीदार, व्यापारी, हितचिंतक यांचा विश्र्वास संपादन केला आहे. वर्धापनदिन कार्यक्रमास सरपंच सौ. ललिता बरगावे, डॉ. पन्हाळकर, कुमार पाटील, नानासाहेब शहापुरे, अरूण शिंदे उपस्थित होते व या मान्यवरांनी शिवसमर्थच्या आर्थिक वाटचालीचे कौतुक करत ऍड. बोत्रे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दरम्यान, वर्धापनदिनानिमित्त सायंकाळी सहा वाजता सुश्राव्य भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच वर्धापनदिनानिमित्त सर्व प्रकारच्या मुदत ठेवींवर एक टक्का ज्यादा व्याजदर देण्यात येणार आहे. याचा लाभ सर्व ठेवीदार, सभासद यांनी घ्यावा असे आवाहन हेमंत तुपे यांनी या कार्यक्रमात व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे उदय पाटील, युवराज माने, सुशांत तुपे, प्रफुल्ल कचरे, चंद्रशेखर चंदुरे, शेखर चव्हाण, मदन पाटील, आकाश जगताप आदींनी विशेष परिश्रम घेतले.