Breaking News

अज्ञात युवकांची एसटी बसवर दगड फेक


पाथर्डी/प्रतीनिधी
शहरातील जुन्या बसस्थानकात उभ्या असलेल्या पाथर्डी-कोल्हापूर व मुंबई या दोन एसटी बसवर बुधवारी रात्री आठ वाजता अज्ञात युवकांनी दगड फेक करून बसचे नुकसान केले.

शहरातील जुन्या बस स्थानकात बुधवारी रात्री आठच्या सुमारास पाथर्डी आगाराची एम.एच.40 ए.क्यु 6017 या क्रमांकाची बस कोल्हापूरकडे जाण्यासाठी थांबलेली होती. यावेळी प्रवासी बस मध्ये चढत असताना त्याचवेळी अचानकपणे काही युवकांनी बस मधील प्रवासी, चालक, वाहक यांच्या जीवाची परवा न करता जाणीवपुर्वक बसच्या समोरून जोरदार दगड फेक केली. त्यामुळे बसची समोरची काच फुटली. त्यावेळी वाहकाने त्या युवकाला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु वाहकाचे दिशेने दगड फेक केल्याने वाहकाला दगडफेक करणार्‍या युवकाला पकडता आले नाही. यामुळे परिसरात पळापळ होवून दुकाने बंद झाली. पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी, हवालदार अरविंद चव्हाण, पोलिस शिपाई ज्ञानेश्‍वर रसाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. परतू तो पर्यंत आरोपी पळून गेला होता. याबाबत मात्र, एकाच अज्ञात युवकाने दगड फेक करून बसची काच फोडून नुकसान करून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी चालक दत्तात्रय खेडकर यांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दिलीप राठोड हे करीत आहेत. दगडफेक कोणत्या उद्देशाने व कोणी करायला लावली यामागचे सूत्रधार कोण आहेत. याचा तपास पोलिस करत आहेत.