Breaking News

सज्जनगडावरुन पडून एकाचा मृत्यू


सातारा : प्रतिनिधी : सज्जनगडावरून पडून जनार्दन शिवाजी मांडवे (वय 35, रा. निगडी वंदन, ता. सातारा) यांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. तोल जाऊन पडल्यामुळे ही दुर्घटना घडली. जनार्दन मांडवे हे सोमवारी एका मित्रासोबत सज्जनगड येथे गेले होते. गडाच्या दक्षिण भागात ते दोघे उभे असताना जनार्दन यांचा तोल गेला व ते दरीत खाली पडले. या घटनेने त्यांचा मित्र घाबरला व तेथून तो तसाच गड उतरून खाली आला. मंगळवारी सकाळी त्याने याबाबतची माहिती मांडवे कुटुंबीयांना दिल्यानंतर ते हादरून गेले. सकाळपासून मृतदेह शोधण्यास सुरुवात केल्यानंतर दुपारी जनार्दन मांडवे यांचा मृतदेह पोलिसांना सापडला