Breaking News

राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीसपदी चमडेवाला


अहमदनगर/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे जनरल सेक्रेटरीपदी येथील मुक्तार उस्मान चमडेवाला यांची नियुक्ती विभागाचे प्रदेशाध्यक्ष अ. गफ्फार मालिक यांनी केली. या नियुक्तीचे पत्र त्यांना राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते आ.अरुण जगताप यांच्या निवासस्थानी समारंभात देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, बाळासाहेब जगताप, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख आदी उपस्थित होते. त्यांच्या नियुक्तीबद्दल माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले.