Breaking News

बक्षिसरुपी मिळालेली हजारो रुपयांची रक्कम शाळेस समर्पित


जामखेड /ता.प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील धोंडपारगाव येथील जि.प.प्राथमिक शाळा दत्तवाडी, या शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या बौद्धिक व कलेच्या सामर्थ्यावर मिळविलेलीहजारो रूपयांची पारितोषिके शाळेसाठी समर्पित केली आहेत. वर्षभर आयोजित विविध स्पर्धा , स्पर्धात्मक परीक्षा आदींमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.त्यामधून मिळणाऱ्या पारितोषिकाची रक्कम शाळेसाठी दिली आहे.

यावर्षी शाळेसाठी लोकसहभागातून सभागृह साकारण्याची संकल्पना व्यक्त करून त्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक मनोहर इनामदार यांनी नागरिकांनामदतीचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी हे कृत्य केले.

प्राची शिंदे या विद्यार्थिनीचा शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हागुणवत्तायादीत निवड झाल्याबद्दल लोकसहभागातून पाच हजार रू.व स्मृतिचिन्ह देऊन तिचा शाळेकडूनगौरव करण्यात आला.या विद्यार्थीनीने पालकांना विनंती करत त्यात एक हजार रू.जमा करून एकूण सहा हजार रू.शालेय सभागृहासाठी समर्पित केले. प्राजक्ताघोगरे हिनेही तिला मिळालेला सन्मान शाळेस समर्पित केला. जयशंकर दत्तात्रय शिंदे , प्रेमराज विकास शिंदे, अक्षता विकास शिंदे आदी विद्यार्थ्यांनी आपले रोखरकमेची बक्षिसे या कार्यासाठी दिली.

गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, नान्नज बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी जयश्री मुकणे ,केंद्रप्रमुख सुनिल बुद्धीवंत, प्रसिद्ध युवा उद्योजक संतोष पवार , उदयोगपती रमेश आजबे, 'विश्वदर्शन'चे संचालक .गुलाब जांभळे आदींनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.