Breaking News

पाकिस्तानचे तोंड फुटले भारताच्या मार्‍यात पडलेल्या विमानाचे अवशेष जाहीर


इस्लामाबादः भारतीय हवाई दलाच्या मार्‍यामुळे कोसळलेल्या पाकिस्तानच्या एफ 16 लढाऊ विमानाच्या अवशेषांचे फोटो जाहीर करण्यात आले आहेत. यासोबतच पाकिस्तान सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी दिलेल्या खोट्या विधानांची पोल खोल झाली आहे.

भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राइक नंतर एकाच दिवसात पाकिस्तानची लढाऊ विमाने भारतीय सीमेत घुसली. या विमानांना भारतीय हवाईदलाने चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय हवाई दलाच्या मार्‍यात पाकिस्तानचे एफ16 विमान कोसळले आणि तुटले, तर त्याच्या पायलटला मात्र पॅराशूटने उतरावे लागले. या तुटलेल्या विमानाच्या इंजिनाचे फोटो जाहीर केले आहेत. हे पाकिस्तानच्या सेव्हन नॉर्थ इन्फंट्रीचे विमान आहे. हे विमान पडल्यावरचे फोटो प्रदर्शित करण्यात आले आहे.

पाकिस्तानचे मेजर जनल आसिफ गफूर यांनी पाकिस्तानचे काहीच नुकसान झाले नसल्याचे स्पष्टीकरण बुधवारी दिले होते. तसेच पाकिस्तानची जी लढाऊ विमाने भारताच्या सीमेत घुसली त्यात एकही एफ 16 विमान नव्हते, असेही त्यांनी सांगितले होते; पण आता त्या ‘नसलेल्या’ विमानाचेच फोटो जाहीर झाले असल्यामुळे पाकिस्तान सपशेल तोंडावर आपटले आहे.