Breaking News

शेतकर्‍यांना चांगला दर देणार : नंदकुमार मोरेमायणी / प्रतिनिधी : माजी आमदार व चेअरमन प्रभाकर घार्गे यांनी पाहिलेले दुष्काळी भागातील शेतकर्‍यांसाठीचे स्वप्न आज कराड उत्तरचे नेते, को-चेअरमन मनोज घोरपडे यांच्या साथीने पूर्ण होत असून खटाव माणसह कराड उत्तरमधील शेतकर्‍यांचा हक्काचा साखर कारखाना पूर्ण झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उसाला आपण चांगला दर मिळेल, असे प्रतिपादन कारखान्याचे संचालक नंदकुमार मोरे यांनी काढले.
पडळ (ता. खटाव) येथील खटाव माण अँग्रो शुगर कंपनीच्या प्रथम हंगामातील उत्पादित झालेल्या पहिल्या पाच साखर पोत्यांचे विधिवत पूजन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे, को- चेअरमन मनोजदादा घोरपडे, कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे, संचालक नंदकुमार मोरे, बाळासाहेब माने, विक्रम घोरपडे, प्रदीप विधाते, भास्कर चव्हाण, कृष्णात शेडगे, महेश घार्गे, अमोल पवार, ऍड. धनाजी जाधव, युवराज साळुंखे, जयवंत जाधव, आण्णासाहेब निकम, अमोल पवार, महेश चव्हाण, टेक्निकल डायरेक्टर बालाजी जाधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना नंदकुमार मोरे म्हणाले, खटाव माण हा दुष्काळी भाग असला तरी, या भागातील ऊसउत्पादक शेयकर्‍यांची पाण्याविना, ऊस दराविना मोठी कुचंबणा होत असल्याचे निदर्शनास येत होते. परंतू खटाव माण अँग्रो साखर कारखान्याच्या रूपाने शेतकर्‍यांचीही फरफट आता थांबणार आहे. खटाव माण अँग्रो शेतकर्‍यांना चांगला दर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले या कार्यक्रमास कारखान्याचे अधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.