Breaking News

प्रा. नामदेव जाधवांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी


राहाता/प्रतिनीधी: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना देशद्रोही म्हणत शिक्षकांविषयी बेताल व आक्षेपार्ह वक्तव्य करणारे प्रा. नामदेव जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीनेकारवाई करावी अशी मागणी राहाता तालुका प्राथमिक शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीच्यावतीने करण्यात आली आहे. ताशा आशयाचे निवेदन पोलिसांनादेण्यात आले आहे.

स्वतःला प्राध्यापक म्हणवणारे व खासगी क्लासेस चालवणारे पुणे येथील प्राध्यापक नामदेव जाधव यांनी दि.18 फेब्रुवारी 2019 रोजी एका जाहीर कार्यक्रमातबोलताना शिक्षकांना देशद्रोही म्हटले . तसेच शिक्षक काम न करता पगार घेतात असे आक्षेपार्ह बेताल वक्तव्य शिक्षकांच्या बाबतीत केले. यामुळे शिक्षकांमध्येनाराजीचे वातावरण असून त्यांच्यावर भादवी कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी.