Breaking News

महिला कलांवंताचे उपोषण तिसर्‍या दिवसीही सुरु


जामखेड ता/प्रतिनीधी :जामखेड तालुक्यातील मोहा परिसरातील कलाकेद्र संचालक व महिला कलावंताच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून प्रशासन जो पयर्ंत कला केंद्राची परवानगी पुर्ववत करत नाही तो पयर्ंत उपोषण चालूच ठेवणार असल्याचा लोककलावंताचा निश्‍चय आहे. 

जामखेड तालुक्यातील मोहा परिसरात असणार्‍या कला केंद्रबंदीच्या विरोधात मोहा गावच्या ग्रामस्थानी उपोषण सुरू केले होते. त्यास प्रत्युत्तर तसेच आपल्यावर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात कला केंद्र संचालक व माहिला लोककलावंत यांच्या वतीने दि.28 फेब्रुवारी पासून कलाकेंद्रा समोरच आमरण उपोषण चालू केले असून या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. काल रात्री उपोषण कर्त्यापैकी एका महिलाची प्रकृती खालावल्याने रात्री त्यांना जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वच कलाकार न्याय मिळेपर्यन्त उपोषणास ठाम आहेत. तसेच गेल्या तीस वर्षापासून आमचा कोणाला त्रास नाही. तसेच पुढेही आमचा त्रास होणार नाही. आम्हा लोक कलावंताचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे कलाकेंद्र असून ती जर बंद झाली. तर सर्व कलाकारावर उपासमारीची वेळ येईल. तेंव्हा शासनानी सहानुभुतीपुर्वक विचार करून त्वरीत कला केंद्र चालू करण्यास परवानगी द्यावी. 

महिला कलांवत म्हणाल्या की, विघ्नसंतोषी लोकांकडून वेळोवेळी आम्हाला त्रास होत आहे. आम्हाला अस्पृष्य समजुन आमच्या विषयी जातीभेद केला जात आहे. अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच आमची उपजीविका ही आमची पारंपारिक कला सादर करुन त्यातून मिळणारे बिदागीतून चालते. आम्हाला येथील कलाकेंद्रावर सतत राजकीय दबावापोटी होणार्‍या कारवाया थांबवण्यात याव्यात.

महिला कलावंतानी आज असा ठराव घेतला आहे की, जामखेडमध्ये नागपंचमी हा सण महाराष्ट्र राज्यात प्रसिध्दी आहे. नागरिक जामखेडची नागपंचमी बघण्यासाठी राज्यातून येत असतात. पण या नांगपंचमी पासून जामखेडमध्ये महिला कलावंत नृतिका अजिबात येणार नाही असा ठराव घेण्यात आला आहे.

न्याय व हक्कासाठी बीड रोडवरील कलाकेंद्र चालक महीलांचा आजचा तिसरा दिवस व पुरूष कलाकार यांचा पहिला दिवस दहा पुरूष यांनी आज पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.