Breaking News

महिला दिनानिमित्त माहेश्वरी महिला मंडळातर्फे उपक्रम


बेलापूर/वार्ताहर

येथील माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त उत्सव 'ती' चा असा उपक्रम आयोजित केला होता. यावेळी विविध कार्यक्रम वस्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भरभर चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या महिलांना विविध पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे प्रायोजकत्व हरिप्रसाद मंत्रीआणि सुदर्शन जनरल स्टोअर्स यांच्याकडे होते. अंजली खटोड, अनिता लड्डा, सुविधा सोमाणी, व भाग्यश्री सोमाणी या उपक्रमाच्या प्रकल्प प्रमुख होत्या.