Breaking News

विविध रस्ते कामांसाठी ३६ लाख मंजूर


कोपरगाव / ता. प्रतिनिधी – कोपरगाव तालुक्यातील कारवाडी फाटा ते मंजूर या रस्त्यासाठी १८ लाख व करंजी ते प्रजिमा पाच या रस्त्यासाठी १८ लाख असाएकूण ३६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती जिल्हा परिषद बांधकाम समिती सदस्य सुधाकर दंडवते यांनी दिली .

मागील काही वर्षापासून कोपरगाव तालुक्यातील सर्वच रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली होती. राष्ट्र्वादी कॉंग्रेस पक्षाचे आशुतोष काळे यांच्यामार्गदर्शनाखाली सातत्याने रस्त्याच्या कामासाठी निधी मिळावा यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला. त्या पाठपुराव्याला अपेक्षित यशमिळत आहे. 

जिल्हा वार्षिक योजना ५०५४ मधून करंजी ते प्रजिमा पाच (ग्रामरस्ता १८) या रस्त्यासाठी व कारवाडी फाटा ते मंजूर (ग्रामरस्ता ९९) या रस्त्यासाठी३६ लाख रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच या रस्त्यांचे नूतनीकरणाचे काम सुरु होणार आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये १४रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. कोपरगाव तालुक्यातील खराव झालेल्या रस्त्यांचा एकत्रित अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठवविला असून लवकरच निधीउपलब्ध होऊन उर्वरित रस्त्यांची कामेही मार्गी लागतील असे दंडवते यांनी सांगितले.