Breaking News

मनोहर पर्रिकर यांचे निधन


देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. पर्रिकर यांच्या निधनाने भाजपने गोव्यातील पक्षाचा चेहरा आणि स्वच्छ प्रतिमेचा नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
साधं राहणीमान असलेले मनोहर पर्रिकर यांनी स्वच्छ प्रतिमेमुळे गोव्याच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण केला. वर्षानुवर्षे राजकीय अस्थिरता पाचवीला पुजलेल्या छोट्याशा गोव्यात पर्रिकर यांनी मात्र आपल्या कुशल नेतृत्वाने ही अस्थिरता संपुष्टात आणली. मुख्यमंत्री म्हणून पर्रिकर यांनी गोव्याला यशस्वी नेतृत्व दिलं.