मोठ्या नुकसानीची ‘जैश’ची कबुली


इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त पाकिस्तान सरकार आणि त्यांच्या लष्कराने नाकारले आहे; परंतु ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने मात्र भारताच्या हवाई हल्ल्यात मोठे नुकसान झाल्याची कबुली दिली आहे. ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अझहरचा धाकटा भाऊ अम्मार याने एका ऑडिओ क्लिपद्वारे या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘सोशल मीडिया’वर अम्मार याचा ऑडिओ व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये अम्मार याने भारतीय हवाई दलाच्या विमानांनी बालाकोटमधील तळ उद्ध्वस्त केल्याचे म्हटले आहे. तसेच ‘मर्काज’ (धार्मिक शिक्षणाचे केंद्र किंवा मदरसा) वर बॉम्ब फेकल्याचे सांगितले आहे. याबाबत त्याने नाराजी व्यक्त करत शत्रूंनी युद्ध पुकारले आहे, असे म्हटले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget