Breaking News

पक्ष्यासांठी मुठभर दाणा-घोटभर पाणी उपक्रम


पारनेर/प्रतिनिधी : मुठभर दाणा-घोटभर पाणी या पर्यावरण पुरक उपक्रमासाठी विद्यार्थ्यांचा मनापासून सहभाग असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सृृष्टीमिञ परिवाराचे संयोजक लतिफ राजे यांनी केले. पारनेर स्थाल किसान इंटरनँशनल पब्लिक स्कूल व सृष्टीमित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मुठभर दाणे-घोटभर पाणी या पर्यावरण पुरक उपक्रमांतर्गत किसान इंटरनेशनल स्कुलमध्ये काल उपक्रम आयोजिक करण्यात आला होता. 
 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या निलोफर मोमीन होत्या. प्रमुख उपस्थितीमध्ये सृष्टीमित्र परिवाराचे अध्यक्ष लतिफ राजे, अमन राजे, अफराज राजे, ताहिर शेख, विजय सुर्यवंशी, नरेश भोसले, निखील बेंन्द्रे, समीना मोमीन, वैशाली भगत, वैशाली कौठाळे, स्वाती चेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते चिमण्या व पक्षांसाठी पाणी ठेवण्याचे 150 भांड्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लतिफ राजे म्हणाले की, पूर्वी ज्या प्रमाणे चिमणी, कावळा, पोपट, साळुंखी, पारव, कबुतर असे अनेक विविध प्रकारचे पशु पक्षी दृष्टीस पडत होते. ते आता दिसून येत नाही. त्या गोष्टीला एकच कारण कि दिवसेंदिवस होणारे कमी पर्जन्यमान, पर्यावरणाचा होणारा र्‍हास हे मुख्य कारण आहे. सध्या परिसरात कमी पाउस झाल्याने कोठेही पाणी आढळून येत नाही. त्यामुळे या लहान सजीवांचा जीव वाचविण्यासाठी सृष्टीमित्र परिवाराच्यावतीने मुठभर दाणे घोटभर पाणी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रम साठी विद्यार्थीनी मनापासुन सहभाग नोंदविणे आवश्यक आहे.