Breaking News

‘वंचित बहुजन आघाडी’च्या धसक्याने पवारांची माघार : प्रकाश आंबेडकर


मुंबई : वंचित बहुजन आघाडीने माढा लोकसभा मतदार संघातून धनगर समाजातील लोकप्रिय नेते विजय मोरे यांना उमेदवारी जाहिर केली आहे. याचा धसका शरद पवार साहेबांनी घेतला असावा म्हणून त्यांनी माढातून माघार घेतली असल्याची प्रतिक्रीया वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, सोमवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपण निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले. पवार यांच्या निर्णयानंतर आंबेडकर यांनी लागलीच प्रतिक्रिया दिली आहे.