Breaking News

सोेनवडीच्या विद्यालयात मुलींना सायकलवाटप


परळी / वार्ताहर : सातारा तालुक्यातील सोनवडी गजवडी येथील श्रीमंत अभयसिंहराजे भोसले विद्यालय व ज्युनियर कॉलेजमधील होतकरू व गरजू विद्यार्थीनींना दहा सायकल्सचे मोफत वाटप करण्यात आले. जिल्हा महिला बालकल्याण विभाग व पंचायत समिती सातारा यांच्या सेस फंडातून वाटप करण्यात आले. या विद्यालयात परिसरातील कारी, आंबळे, रायघर, सज्जनगड, कुस या परिसरातून विद्यार्थीनी येत असतात. त्यांना या मोफत सायकलसुविधेचा लाभ मिळाला. या उपक्रमासाठी पंचायत समिती सदस्य अरविंदबापू जाधव, उपक्रमशील शिक्षक अशोक कदम यांनी विशेष प्रयत्न केले.