Breaking News

पर्यावरण संवर्धन काळाची गरज - चंद्रकांत पाटील


राजूर/प्रतिनिधी: महिलांचे आरोग्य, शिक्षण व महिला स्वयंपूर्ण होण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. पारंपरिक बियाणे संवर्धनातून आपली ओळख निर्माण केलेल्या राहीबाईपोपेरे यांचे कार्य पथदर्शी आहे . पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. गावागावात राहिबाईं निर्मांण होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रकांतपाटिल यांनी केले. बिजामाता राहिबाईं पोपेरे यांच्या गावराण बियाणे बँकेच्या व घराच्या उद्घाटनावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळीपालकमंत्री प्रा. राम शिंदे, सरपंच शांताबाई पोपेरे, जि. प. सदस्य जालिंदर वाकचौरे,जि.प.मा.अध्यक्ष अशोकराव भांगरे,जि.प. सदस्य सुनिता भांगरे,डॉ. किरणलहामटे, बाजीराव दराडे,शिवाजीराजे धुमाळ,सिताराम भांगरे,ज्येष्ठ पत्रकार मिलिंद भागवत, संदिप भुजबळ, शिवाजी धुमाळ,नितीन जोशी,दिपक वैद्य,डॉ.रामहरी चौधरी, विकास कोटकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राहीबाई म्हणाल्या, वीस वर्षांपासून पारंपारिक बियाणांच्या संवर्धनाचे काम करत आहे. आज तीन हजार महिलांसोबत काम करत आहे.पारंपरिक बियाणे संवर्धनासाठी आवश्यक बियाणे बँक व घरांची अडचण पुण्यातील एका कार्यक्रमात मांडली. महसूलमंत्र्यांनी या मागणीची तातडीने दखल घेतबियाणे बँक व घरांची उभारणी करुन दिली. या बियाणे बँकेच्या मदतीने पारंपरिक बियाणे जपण्याचे काम वाढविणार आहे.

केंद्रशासनाकडूनही होणार गौरव
दुर्गम भागात राहीबाईंनी बियाणे संवर्धनाच्या कार्यात दिलेले योगदान आदर्शवत असून या कामाने देशाचे लक्ष वेधले आहे.याची दखल घेऊन केंद्रशासनाकडूनही त्यांच्या कार्याचा गौरव केला जाणार आहे. दुर्गम भागात सेवाभावी वृत्तीने केलेले काम नक्कीच सर्वांसाठी दिशादर्शक ठरेल.

- प्रा.राम शिंदे,पालकमंत्री