Breaking News

पोवईनाक्यावर जलवाहिनी फुटली


सातारा / प्रतिनिधी : सातारा शहरात सुरु असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे सातारकरांचे प्रचंड हाल सुरु असतानाच खोदकाम सुरु असताना ..... येथे जलवाहिनी फुटल्याने दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. उन्हाच्या झळा तीव्र होत असताना होणारा या पाण्याचा अपव्यय पुढील काळात अडचणीचा ठरणार आहे.
ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे सातारकरांना वाहतूक, धूळ, मनस्ताप याचा त्रास होत असतानाच आता खोदकाम करत असताना जेसीबीच्या पात्याचा धक्का लागल्याने प्राधिकरणाची जलवाहिनी फुटल्याने प्रचंड प्रमाणात पाणी वाया जात आहे. 

शुद्धीकरण होवून आलेले पाणी असे वाया जात असेल तर ते थांबवणे हे प्राधिकरणाचे काम आहे. मात्र पाचशे मीटर अंतरावर असलेल्या प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे कृष्णा नदीतून उपसा होणार्‍या पाण्यातही मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. पावसाळा सुरु होण्यास आणखी दोन महिन्याचा कालावधी असून तोपर्यंत पाणी पुरवणे ही काळाची गरज आहे. पावसाळा लांबल्यास नागरिकांचे पाण्यासाठी मोठे हाल होण्याची शक्यता आहे. पाणी बील भरले नाही तर तातडीने येवून पाणी कनेक्शन बंद करणार्‍या प्राधिकरणाला ही फुटलेली जलवाहिनी दिसत नाही का? असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे.