Breaking News

निघोजमध्ये उद्यापासून कीर्तनमहोत्सव पट्टानिघोज/ प्रतिनिधी

मळगंगा मिल्क अॅण्ड अॅग्रो प्राॅडक्टस प्रा. लि. कन्हैया दूध उद्योग समूहाच्या 22 व्या वर्षात वर्धापन दिनानिमित्त ३० मार्च ते ६ एप्रिल पर्यंत किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक मच्छिंद्र लंके यांनी दिली .

श्रीकांत महाराज गागरे, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, आक्रुर महाराज साखरे, संजयनाना महाराज धोंगडे, ज्ञानेश्वर महाराज पठाडे, पुरूषोत्तम महाराज पाटील, नामदेव महाराज लबडे आदींचीकिर्तने यावेळी होणार आहेत. श्री क्षेत्र सरला बेट येथील मठाधिपती रामगीरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहनसंयोजकांनी केले आहे.