Breaking News

केंद्रीय इंटकच्या सचिवपदी गोविंदराव मोहिते यांची निवड


पाटण / राजेंद्र लोंढे : राष्ट्रीय मजदूर कॉंग्रेसच्या (केंद्रीय इंटक) रायपूर येथील छत्तीसगडमध्ये पार पडलेल्या 92 व्या जनरल कौन्सिलच्या सभेत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांची केंद्रीय सचिवपदी अभिनंदनीय निवड झाली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाला हा मोठा मान मिळत असल्याने,महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या राज्यातील विविध कारखान्यामधील कामगारांकडून या निवडीचे जोरदार स्वागत होत आहे. 

गोविंदराव मोहिते यांच्याकडे केंद्रीय इंटकच्या पगारदार नोकर आणि व्यावसायिक कामगार फेडरेशन तसेच राष्ट्रीय वस्रोद्योग कामगार फेडरेशनच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी पूर्वी प्रमाणे कायम ठेवण्यात आली आहे.केंद्रीय इंटकच्या छत्तीसगड येथे अलिकडेच दशभरातून आलेल्या 1500 जनरल कॉन्सिल सदस्यांच्या सभेत डॉ.जी.संजीवा रेड्डी यांचीअध्यक्षपदासाठी फेरनिवड झाली तर त्यांच्याच अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यकारिणीत गोविंदराव मोहिते यांची वरील प्रमाणे संघटन सचिव पदावरून सचिवपदावर निवड झाली आहे.गोविंदराव मोहिते यांनी गिरणी कामगार घराच्या प्रश्र्नावर अध्यक्ष सचिनभाऊ अहिर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या यशस्वी लढ्यात दिलेले योगदान तसेच कामगार संयुक्त कृती समितीने कामगारांच्या प्रश्र्नावर उभ्या केलेल्या लढ्यात श्री. मोहिते यांनी बजावलेली भूमिका विशेष गाजली आहे.राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या आज पार पडलेल्या पदाधिकार्‍यांच्या सभेत सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांचे आभिनंदन करण्यात आले आहे.