टिळकनगरमध्ये पल्स पोलीओ मोहीम


टिळकनगर/प्रतिनिधी
तालुक्यातील टिळकनगरमध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यावतीने घेण्यात आलेल्या पल्स पोलिओ मोहिमेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. सकाळ पासूनच लसीकरण केंद्रावर पालकांच्या लहान मुलांना घेऊन रांगा लागल्या होत्या. टिळकनगर येथील अंगणवाडी 264 क्रमांकचयावतीने दोन दिवस आधीपासून गावामध्ये पल्स पोलिओ बाबत जनजागृती करत पत्रके व फलक लावण्यात आले होते. पल्स पोलिओ अभियानाला रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सुरवात करण्यात आली.

याप्रसंगी रांजणखोल ग्रामपंचायतीच्या महिला सदस्या सविता सिध्दार्थ बागुल, परवीन जाकीर शेख, रजिया शकील पठाण, मंगल गणेश आवारे, यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पोलिओ संदर्भात पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी परिसरातील 250 बालकांना शंभर टक्के लसीकरण करण्यात आले. यावेळी आरोग्य केंद्राच्या आशा प्रतिभा गणेश शिंदें, आशा कडूभाई प्रमोद हिवाडे, अंगणवाडी सेविका सायरा शेख, मदतनीस लता शेळके यांनी लसीकरण केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget