Breaking News

जैनमुनींवरील हल्ल्याच्या निषेधार्थ प्रांताधिकार्यांना निवेदन


श्रीरामपूर/प्रतिनिधी: जैन मुनी सिध्दसेन विजय महाराज यांना विहारा दरम्यान झालेल्या अमानुष मारहाणीचा निषेध करत दोषींवर कारवाई कारवाई व महाराजांना पोलीस संरक्षण द्यावे या मागणीसाठी सकल जैनसमाज, श्रीरामपूर यांच्या वतीने प्रांताधिकार्यांना निवेदन दिले.

जैन समाजातील धर्मगुरुंवर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. जैन समाज अल्पसंख्यांक असून जैन धर्मगुरु हे शांतप्रिय व अंहिसावादी असतात . ते सर्वत्र पायी विहार करतात. त्यांच्यासोबत काहीसमाज बांधव देखील असतात. याकरता त्यांच्या संरक्षणाकरिता त्यांना शासकीय सरंक्षण द्यावे, हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी.आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांच्यावतीने तेलोरे यांनी निवेदन स्वीकारले. याबाबत शासनास कळवले जाईल असे अश्वासन दिले.

यावेळी सकल जैन समाजाचे अनिल पांडे, मनसुख चोरडिया,जैनस्थानकाचे विश्वस्त रमेश गुंदेचा , दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष संजय कासलिवाल, अमित गांधी , नगरसेवक जितेंद्रछाजेड,समित मुथ्था, सुरेश संचेती , रवींद्र लुनिया, अजय डाकले, उदय गंगवाल, पंकज छल्लणी, राजेद्र पाटणी, प्रकाश पांडे, राहुल शाह, गिरीश बाठिया, किशोर गदिया आदि उपस्थित होते.