Breaking News

शुध्द नितीचा सहकार देशाला मार्गदर्शक - कोठडीया


संगमनेर/प्रतिनिधी: स्वातंत्र्यप्राप्तीसाठी तरुण वयात लढणार्‍या भाऊसाहेब थोरातांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहकारातून सामान्य माणसांच्या जिवनात समृध्दता आणली. नैतिकता,शुध्दचारित्र्य,प्रामाणिकता,निष्ठा अशी जीवनमूल्य असणार्‍या स्व.भाऊसाहेब थोरात यांच्या शुध्द नितीमुळे संगमनेरचा सहकार राज्यात पुढे असून संपूर्ण देशाला दिशादर्शक ठरत असल्याचेगौरवौद्गार कृषीरत्न आनंद कोठडीया यांनी काढले.

अमृत उद्योग समूहाच्या वतीने स्व.भाऊसाहेब थोरात यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमित्त कारखाना कार्यस्थळावर आयोजित आदरांजली कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानीकादवा सह. कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे हे होते.तर व्यासपीठावर आमदार डॉ.सुधीर तांबे, बाजीराव पा.खेमनर, अ‍ॅड.माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, वर्षा कोठडीया,शिवाजीराव थोरात, लक्ष्मणराव कुटे, रणजितसिंह देशमुख,इंद्रजित थोरात, भाऊसाहेब कुटे,रामदास वाघ,अमित पंडित, आर. बी. रहाणे, शरयुताई देशमुख, डॉ.पालवे, आदि मान्यवर उपस्थित होते.

आ.डॉ.तांबे म्हणाले स्व. भाऊसाहेबांनी सहकार हे समाजसेवेचे माध्यम माणून सहकारात आपले जिवन समर्पित केले. त्यामुळेच सहकारातील सामर्थ्य दाखविणारे हे मॉडेल ठरले आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी तर आभार भाऊसाहेब कुटे यांनी आभार मानले.या कार्यक्रमासाठी तालुक्यातील कार्यकर्ते, अमृत उद्योग समूहातील अधिकारी, पदाधिकारी,मोठया संख्येने उपस्थित होते.